FRESH BOOK TITLES IN THE SHOP

NEW ARRIVALS

Checkout Now!

Books

h2e महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धा ९ वर्षाखालील गट - पुण्याचा हेयान रेड्डी व मुंबईची गिरीशा पै विजेते

by Vivek Sohani - 29/05/2025

महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेने तसेच सोलापूर डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशन व द हेरिटेजच्या सहकार्याने सोलापुर चेस अकॅडमीने आयोजित केलेल्या “चॅम्पियन चषक” ९ वर्षाखालील खुला व मुलींच्या राज्यस्तरीय निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत यजमान सोलापूरसह मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, सांगली, लातूर, अमरावती, पालघर, छ. संभाजीनगर आदी राज्यातील विविध जिल्ह्यातुन ३६ आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडूसह एकूण २०२ नामांकित खेळाडूंनी विक्रमी सहभाग नोंदवला.



लक्ष दिघे व अन्वी हिंगे यांना उपविजेतेपद

महाराष्ट्राचे चेस असोसिएशन व सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन यांच्या मान्यतेने सोलापूर चेस अकॅडमीने आयोजित केलेल्या “चॅम्पियन चषक” एचटूई पॉवर सिस्टिम्स ९ वर्षाखालील खुला व मुलींच्या राज्यस्तरीय निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धा गांधीनगर येथील द हेरिटेज येथे आज संपन्न झाल्या. स्विस् लीग पद्धतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेच्या अंतिम आठव्या फेरीनंतर मुलांच्या गटात पुण्याच्या हेयान रेड्डीने आठ पैकी साडेसात गुण करून अजिंक्यपद पटकाविले त्याला रोख दोन हजार रुपये, आकर्षक चषक व मेडल्स देऊन गौरविण्यात आले. तसेच मुलींच्या गटात मुंबईच्या आंतरराष्ट्रीय गुनांकन प्राप्त खेळाडू गिरीशच्या पै हिने स्पर्धेमध्ये निर्विवाद वर्चस्व राखत आठ पैकी आठ गुण मिळवत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. तसेच मुलांच्या गटात मुंबईच्या लक्ष दिघे याने सात गुणांसह तर मुलींच्या गटात पुण्याच्या अन्वी हिंगे हिने देखील सात गुणांसह स्पर्धेचे उपयोजितपद प्राप्त केले.

मुलांच्या गटातील विजेता हेयान रेड्डीला गौराविताना मान्यवर

स्पर्धेचा बक्षीस समारंभ द हेरिटेजचे व्यवस्थापक श्रवण कुमार, खुशी हजारे, संघटनेचे सचिव सुमुख गायकवाड, प्रमुख पंच मुंबईचे आंतरराष्ट्रीय पंच संदेश नागरनाईक, राष्ट्रीय पंच संतोष पाटील, आंतरराष्ट्रीय गुनांकन प्राप्त अतुल कुलकर्णी, सुभाष उपासे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी सहायक वरिष्ठ राष्टीय पंच उदय वगरे, शशिकांत मक्तेदार, रोहिणी तुम्मा, युवराज पोगुल, भरत वडीशेरला, विजय पंगुडवाले, यश इंगळे, नवीना वडीशेरला, नागराज वडीशेरला यांना देखील गौरविण्यात आले. आपल्या मनोगतात श्रवण कुमार यांनी उपस्थितांना बुद्धिबळाचे महत्व विषद करत राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यापीठ खेळाडू संतोष पाटील यांनी केले. विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिके, मेडल्स तसेच आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.

मुलींच्या गटातील विजेती हेयान रेड्डीला गौराविताना मान्यवर

अतिशय चुरशीने झालेल्या मुलांच्या गटात पुण्याचा गोरांक्ष खंडेलवाल व ठाण्याचा दक्ष राऊत या दोघांनी साडेसहा गुण प्राप्त केले. परंतु सरस टायब्रेकवर गोरांक्षने तिसरा तर दक्षने चौथा क्रमांक पटकाविला. मुलींच्या गटात मुंबईच्या सानामेरी पॉल, छत्रपती संभाजीनगरची प्रियल शिखरे व पुण्याची ऋत्वि हरपुडे यांचे देखील प्रत्येकी सहा गुण झाले होते. परंतु सरस टायब्रेकवर सानामेरीने तिसरा, प्रियलने चौथा तर ऋत्विने पाचवा क्रमांक प्राप्त केला. मान्तिक अय्यर (पुणे), अनिश जवळकर (पुणे), आदित्य सिद्धार्थ (मुंबई), इवान दुबे (मुंबई), अन्वित सोनटक्के (नागपूर), नोवा अय्यर जुयल (मुंबई) यांनीदेखील उत्कृष्ट कामगीरी करत प्रत्येकी सहा गुणांसह अनुक्रमे सहावा ते दहावा क्रमांक मिळविला. तसेच मुलींमध्ये रीवा चरणकर (सातारा), पृथा ठोंबरे (सोलापूर), विहा मेहता (अमरावती), अनन्या चव्हाण (मुंबई), अनिश्का बियाणी (मुंबई) यांनी देखील उल्लेखनीय यश मिळवीत प्रत्येकी साडेपाच गुणासह सरस टायब्रेकवर अनुक्रमे सहावा ते दहावा क्रमांक प्राप्त केला. सर्वांना रोख बक्षीस, चषक व मेडल्स देऊन सन्मानित केले. तसेच स्पर्धेतील साडेचार वर्षीय सर्वात लहान खेळाडु वल्लभ कुलकर्णी (छ. संभाजीनगर) याला देखील उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

नऊ वर्षाखालील राष्ट्रीय निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला महाराष्ट्राचा दोन मुले व मुलींचा संघ:

मुले :- हेयान रेड्डी (पुणे), लक्ष दिघे - (मुंबई ) मुली :- गिरीशा पै (मुंबई), अन्वी हिंगे (पुणे)

उत्तेजनार्थ बक्षीसे पुढील प्रमाणे

विजेत्या खेळाडूंसोबत उत्तेजनार्थ पारितोषिक विजेते खेळाडू आणि मान्यवर

७ वर्षे वयोगट (मुले): रिधान करवा (कोल्हापूर)- ४.५, अद्वैत कुलकर्णी (कोल्हापूर) – ४, हितांश सुराणा (संभाजी नगर)- ३.५

७ वर्षे वयोगट (मुली): श्रेया शेळके (संभाजी नगर) - ४.५, अरिशा वाघमारे (ठाणे) - ३.५, अनाईका कुमारी (संभाजी नगर) - ३,

उत्कृष्ट सोलापूर (मुले): हर्ष जाधव – ५, नैतिक होटकर - ४.५, प्रथम मुदगी - ३.५

उत्कृष्ट सोलापूर (मुली): संस्कृती जाधव - ४.५, उत्कर्षा लोखंडे – ४, ईशा पटवर्धन- ३

फोटो ओळी: राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या व पारितोषिक विजेत्या खेळाडूंसमवेत मान्यवर




Contact Us